मलकापूर : -( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) नूतन इंग्लिश स्कूलमध्ये २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हॉकी सम्राट मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर क्रीडा शिक्षक आकाश लटके यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या निमित्त शाळेत अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कौशल्याचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
नूतन इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा!
			