Headlines

मलकापूर शहरात गणेश आगमन सोहळ्यात डीजेचा धडाका; १६ डीजे चालकांवर कारवाई

मलकापूर : शहरात गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यात डीजे चालकांनी मनमानी पद्धतीने कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून कायद्याचे उल्लंघन केले. नियमांची पायमल्ली करून १२० डेसिबलच्या आसपास आवाजात डीजे वाजवण्यात आले होते. या प्रकारामुळे गणेशभक्तांसह पोलिसांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत मलकापूर शहरातील तब्बल १६ डीजे चालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!