मलकापूर ( दिपक इटणारे ) :”शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो” असं म्हणतात. पण शिल्पकारच जर मातीमोल निघाला, तर शिल्प कसं घडणार? असं म्हणावं लागेल, कारण मलकापूरातील एका नामांकित इंग्लिश शाळेतील शिक्षकाने केलेली संतापजनक कृत्ये आता शहरभर चर्चेत आहेत. बुलढाणा रोडलगत असलेल्या एका प्रतिष्ठित इंग्लिश शाळेत ( शाळेची बदनामी होऊ नये त्या करिता शाळेचे नाव वगळण्यात आले आहे ) कार्यरत असलेला त्याला दारूचे “धोरण” असलेला शिक्षक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बसस्थानकाजवळील रस्त्यावर दारूच्या नशेत विरुद्ध दिशेने गाडी हाकत आला आणि योग्य मार्गाने जात असलेल्या नागरिकाला अकारण शिविगाळ केली. “उलटा चोर कोतवाल को डाटे” ही म्हण यावेळी अक्षरशः खरी ठरली. नागरिकाने त्याला गाडी थांबविण्याची विनंती केली असता, तो डांगीला पाय लावून घटनास्थळावरून पळ काढू लागला. मात्र, रागाने पेटलेल्या नागरिकाने त्याचा पाठलाग करून पकडलं. यावेळी त्या शिक्षकाची मस्ती थांबली नाही. उलट त्याने नागरिकांच्या गळ्यावर हात घालण्याचाही प्रयत्न केला. संतप्त नागरिकाने त्याला चांगलाच चोप दिला. एवढ्यावरच थांबून न राहता उपस्थित नागरिकांनीही त्या “बेवड्या” शिक्षकाला धुऊन काढलं. शेवटी चांगलाच दणका बसल्यानंतर या शिक्षकाने आपली चूक मान्य केली आणि शेपूट पायात घालून पसार झाला. या घटनेत सर्वात धक्कादायक म्हणजे हा “नशेबाज” शिक्षक एका नामांकित इंग्लिश शाळेत कार्यरत आहे. ज्या शाळेत लहानग्यांपासून ते १०वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात, तिथे शिक्षकांच्या वागण्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. “गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु” म्हणणाऱ्या देशात, गुरुच जर “दारुड्या” निघाला तर विद्यार्थ्यांनी आदर्श कुणाचा घ्यावा? हा प्रश्न आता पालकांपुढे उभा राहिला आहे.
राज्यात यापूर्वीही दारूच्या नशेत शिक्षकांकडून विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. “दारूच्या नशेत माणूस आपला ताबा गमावतो आणि मग तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो” हे सत्य आपण पाहिलंच आहे.
मग असा दारूडा शिक्षक विद्यार्थिनींवर किंवा इतर विद्यार्थ्यांवर किती मोठं संकट बनू शकतो? हा धोक्याचा इशारा म्हणून पालकांनी आणि शाळा व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “एका व्यक्तीच्या चुकीने संपूर्ण शाळेची प्रतिमा मलिन होत आहे. अशा शिक्षकाला मुलांवर संस्कार करण्याचा अधिकारच नाही,” असं पालकांचे मत आहे. अनेक पालकांनी संबंधित शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. “दारुड्या शिक्षकाला पाठीशी घालणं म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेलाच काळिमा फासणं होय,” असा सूर आता शहरात उमटू लागला आहे. प्रश्न फक्त रस्त्यावर शिविगाळ करणाऱ्या दारुड्याचा नाही, तर विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या आणि संस्कार घडवणाऱ्या शिक्षकाचा आहे. जर असे शिक्षक शाळेत कार्यरत राहिले, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आणि मानसिकतेला धोका पोहोचेलच. आता पाहणं महत्त्वाचं आहे की शाळा प्रशासन या प्रकरणात कडक भूमिका घेते की डोळेझाक करते. मुळात, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा असतो. पण दिशा देणारा स्वतःच जर भरकटलेला असेल, तर मग त्या समाजाचं काय? हा प्रश्न मलकापूरकरांसह संपूर्ण पालकवर्गाला अस्वस्थ करणारा ठरला आहे.
मलकापूरातील एका नामांकित इंग्लिश शाळेतील “दारूड्या गुरुजींची मस्ती जिरली! नागरिकांनी दारुड्या शिक्षकाला चांगलाच चोपला”! कोण तो दारुड्या गुरुजी वाचा बातमी
