मलकापूर : “तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान” या ओळींप्रमाणे गुरुंच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता सरस्वतीमातेच्या पूजनाने झाली. हे पूजन शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. आपल्या शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट व आकर्षक संचालन कु. ऋतुजा कोलते मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन गणेश पाटील सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात गुरुंबद्दलचा आदर अधिक दृढ करणारा ठरला.
गुरूची कृपा परमेश्वरासम समान… ज्ञानविना जीवन अंधारमय… गुरू हा दीपस्तंभ… तोच खऱ्या अर्थानं जीवनदिशा दाखवणारा! नूतन इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
