मलकापूर : – स्थानिक हरसोडा येथील श्रीमती. व्ही. एस. रायपुरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक ५ जुलै २०२५ वार शनिवारला नवीन शैक्षणिक वर्ष आरंभ निमित्त मोफत पुस्तक वाटपाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये स्कूल व कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांना नवीन शैक्षणिक वर्ष 2025 – 26 च्या अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापनाकडून सर्व विषयांची पुस्तके मोफत वितरित करण्यात आले.
स्कूल व कॉलेजमधील वर्ग नर्सरी, KG 1, KG 2, तसेच वर्ग 1,2,3,4 आणि इतरही वर्गांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या स्कूल बसचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका गौरी उगवेकर (सपकाळ) मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष रायपुरे, प्राचार्य श्री. रविंद्रसिंह राजपूत सर, इंग्लिश विभाग जयश्री मानकर, संचालक श्री. तेजराव रायपुरे, प्राध्यापक मनीष मानकर सर, चव्हाण सर, श्री. लक्ष्मण कोलते, एस. पी. संबारे, गजानन आढाव, मंगेश पटेल, गणेश बाठे, विशाल पटेल, प्रमोद गुलगे, शिवाजी तुरक, निळकंठ मोडक, गजानन कोथळकर, अमोल कराळे, चंद्रशेखर तायडे तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.