मोताळा :- तालुक्यातील खरबडी येथील २० वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत युवकाचे नाव ओम दिलीप किनगे असे असून, विष घेतल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाल्याने नातेवाइकांनी त्याला तातडीने बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाने आत्महत्या सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सुरू आहे.