Headlines

अज्ञात टिप्परच्या धडकेत ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू? कुटुंबीयांकडून अपघाताच्या कारणावर संशय; हिंगणकाजी मलकापूर रोडवर झाला होता अपघात!

मलकापूर : – हिंगणकाजी येथील ७८ वर्षीय हरिदास गोंडूजी फासे यांच्या मृत्यूबाबत नवा खुलासा समोर येत असून, त्यांचा मृत्यू दुचाकी घसरल्याने नव्हे, तर अज्ञात टिप्परच्या धडकेमुळे झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान, देवधाबा ते हिंगणकाजी मलकापूर रोडवर हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर रेती टाकल्याने मोटारसायकल घसरून हरिदास फासे पडले आणि गंभीर जखमी झाले, असे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीयांचा दावा आहे की, त्यांना अज्ञात टिप्परने जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगावला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाली असून, अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, हा अपघात नक्की रेतीमुळे दुचाकी घसरल्याने झाला की अज्ञात टिप्परच्या धडकेमुळे? याबाबत संभ्रम कायम आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!