खामगाव: स्थानिक मेहबूब नगर भागात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बुधसन कुटुंबीय कॉटन कँडी (बुड्डी के बाल) व्यवसाय करतात. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे कॉटन कँडी तयार करत असताना घरगुती गॅस सिलिंडर गळतीमुळे अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत मुकेशकुमार बुधसन (४०), योगेशकुमार बुधसन (२५) आणि सोनुकुमार बुधसन (२०) हे तिघे गंभीर जखमी झाले. पहाटे ५.१५ वाजता त्यांना तातडीने खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जीएमसी अकोला येथे रेफर करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे निर्माण झाले आहे.