कुंभमेळ्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन!

 

बुलढाणा – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाने जाहीर केलेले हेल्पलाईन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत –

प्रयागराज कंट्रोल रूम: टोल-फ्री क्रमांक १९२०, दुरध्वनी क्रमांक ०५२२-२२३७५१५

मंत्रालय नियंत्रण कक्ष: ०२२-२२०२७९९०

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय नियंत्रण कक्ष: ०७२१-२६६१३६४

बुलढाणा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष: ०७२६२-२४२४००

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष: ०७२६२-२४२६८३

प्रयागराज येथे गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!