Headlines

मराठी पत्रकार परिषद मलकापूर तालुकाध्यक्ष पदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद बागवान

 

मलकापूर :- पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ८३ वर्षे जुनी, पत्रकार संघटनांनी मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या मलकापूर तालुका संघाची नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद शेख बशीर बागवान यांची आज ३० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अविरोध निवड करण्यात आली.
आज बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत, कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव शिवाजी मामलकर यांच्या उपस्थितीत मलकापूर तालुका नुतन कार्यकारिणीच्या निवडी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते नारायण पानसरे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी शेख आबीद शेख बशीर बागवान यांची अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर, हरीभाऊ गोसावी यांचेसह सतीष दांडगे, अजय टप, क्रिष्णा मेहसरे, दिपक इटनारे, संदीप सावजी, विजय वर्मा, , अनिल गोठी, निलेश चोपडे, बळीराम बावस्कार, करण झनके, गजानन जैस्वाल, शेख निसार, प्रदीप इंगळे, शेख फहीम शेख नईम, नागेश सुरंगे यांचेसह आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!