Headlines

हरिश रावळ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे घिर्णी येथील विद्युत पोल लावायला सुरुवात

मलकापूर, दि. ९ घिर्णी गावात जवळपास पाचशेच्या वर नागरिक गावाच्या बाहेर शेतात शेती करण्यासाठी राहतात त्यांचे घर सुद्धा शेतातच आहे. गेल्या बारा दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे सर्व इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंळीत झाला आहे. लोकांना घरात झोपणे कठीण झाले आहे. तर प्यायला पाणी नाही जनावरांना सुद्धा संपूर्ण जंगलात पाणी नाही. त्यामुळे या गावातील जनता त्रस्त झाली आहे. महावितरण कंपनीने अद्याप पावतो सर्व्हे केला नसून, खांब, तार सुद्धा आणून ठेवले नाही.त्यामुळे लवकरात लवकर महावितरणची टीम बोलवावी व या भागातील पडलेले खांब उभे करुन त्वरित विद्युत पुरवठा सुरु करावा अशी मागणी घिर्णी गावातील शेकडो नागरिकांनी हरिश रावळ यांच्या
नेतृत्वात महावितरणचे अधिकारी यांच्याकडे केली आहे. दम्यान, संपूर्ण परिस्थिती समजून सांगून वरिष्ठांशी व आमदार राजेश एकडे यांच्याशी बोलून लवकरात लवकर काम करण्यास विनंती केली. त्यावर आमदार एकडे यांनी यांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून त्वरित काम करण्याच्या सूचना दिल्या, अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला.
हरीश रावळ व घिर्णी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीत जाऊन लवकरात लवकर इलेक्ट्रिक पोल लावावे यासाठी जे आक्रमक आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणून आज घिर्णी येथील गावकऱ्यांना महावितरण कंपनीने इलेक्ट्रिक पोल पोहचवले असून, लवकरात लवकर पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *