जळगाव. जा :- मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील सराफा व्यापारी स्वप्नील करे आणि मधुकर लुले यांच्यावर धानोरा-पळशी मार्गावर १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे ८ किलो चांदी, १०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण १५ लाखांचा ऐवज लुटला. व्यापारी व्यवहारासाठी आसलगाव येथील सराफा बाजारात जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे आणि अपोअ अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस तपास सुरू आहे.