जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना मोठे यश आले आहे. रक्षा खडसे यांचा तब्बल 2 लाख 71 हजार 048 मतांनी विजय झाला आहे. रक्षा खडसे यांना या निवडणुकीत 6 लाख 24 हजार 672 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 56 हजार 624 मते मिळाली आहेत. रक्षा खडसे यांची या निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक झाली आहे. निवडणूक काळात रक्षा खडसे यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली होती. पण सलग तिसर्यांदा लोकसभेत निवडून येत रक्षा खडसे यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखवले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, मागील 10 वर्षांपासून रावेरमध्ये भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून, महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे या विजयी झाल्या आहे. रावेर लोकसभेत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी 2 लाख 71 हजार 48 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. रक्षा खडसे यांचा विजय होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात मोठा जल्लोष केला.