मलकापूर ( उमेश ईटणारे ) :- बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरोधात मलकापूर शहरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाज, मलकापूर यांच्या वतीने दिनांक 15 डिसेंबर 2024, रविवार रोजी करण्यात आले आहे. गोविंद विष्णू महाजन विद्यालय, मलकापूर येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाची सुरुवात होणार आहे.या मूक मोर्चाचा मुख्य उद्देश बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे, त्यांच्या न्यायहक्कांसाठी आवाज उठवणे आणि जागतिक पातळीवर हिंदू समाजावरील अन्यायाबद्दल जनजागृती करणे आहे. या विराट मूक मोर्चामध्ये सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन हिंदू धर्माची एकता आणि शक्ती दाखवावी. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, हा हिंदू समाजाच्या अस्तित्व, श्रद्धा आणि सन्मानाच्या रक्षणासाठीचा संघर्ष आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदू नागरिकाने या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आपले समर्थन नोंदवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात मलकापूरात विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा! हजारो हिंदू बांधवांनी मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन..
