खामगाव :- एमआयडीसीत १२ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीज आणि चिराऊ पावर प्रा. लि. या कार्यालयांमधून अज्ञात चोरट्यांनी एकूण अडीच लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० ते २.३० वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून सुमारे १ लाख रुपयांची रोख तर चिराऊ पावर प्रा. लि.च्या कार्यालयातून सुमारे १.५ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली.
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद
चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामध्ये तीन अज्ञात चोरटे कार्यालयांमध्ये प्रवेश करून चोरी करताना दिसत आहेत.घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.या प्रकारामुळे एमआयडीसी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चोरीबाबत अधिक तपास सुरू असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.