स्कूल बस व दुचाकीची धडक, २१ वर्षीय युवक ठार

बुलढाणा:- तालुक्यातील खुपगाव येथील २१ वर्षीय जीवन मुकुंदा इंगळे याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहराजवळील आश्रम शाळेजवळ घडली. जीवन इंगळे हे बुलढाणा येथील एका हेअर सलून मध्ये काम करत होते. बुधवारी सकाळी ते दुचाकीने कामावर जात होते, त्याचवेळी शिवसाई ज्ञानपीठ शाळेची बस साखळीकडे जात असताना दुचाकीसोबत जोरदार धडक झाली. या धडकेत इंगळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!