ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी; मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- आज, दि.10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मलकापूर शहरातील मुंधळा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या वळणावर ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अजय रत्नाकांत पाटील (वय 37, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) यांचा मृत्यू झाला, तर प्रसाद भटू (वय 46, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) हे जखमी झाले.दोघेही मलकापूर येथे धान्य खरेदी करण्यासाठी दुचाकीने जात असल्याची माहिती आहे. रस्त्याच्या वळणावर अचानक ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे अजय जागीच मरण पावले तर प्रसाद हे जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.ट्रकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून,पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!