भुसावळ:- भुसावळ तालुक्यातील दीपनगर उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री रिक्षा आणि ट्रकचा अपघात होऊन ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालकासह पती-पत्नी जखमी झाले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रमेश बुद्ध सारसर (वय ६२, रा. उमाळी, ता. मलकापूर) हे आपल्या जावई लखन गोविंदा पटोने (वय ३५) आणि मुलगी अंजली लखन पटोने यांच्यासोबत रिक्षा (क्रमांक MH 19 CF 0566) ने मलकापूरहून धरणगावला जात होते. दीपनगर उड्डाणपुलावर भरधाव आयशर ट्रक (क्रमांक MH 19 CY 4833) ने त्यांच्या रिक्षाला धडक दिली.या अपघातात रमेश सारसर यांचा जागीच मृत्यू झाला. लखन पटोने आणि अंजली पटोने हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लखन पटोने यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करत आहेत.