मलकापूर:- : शहरातील टाटा मोटर्स समोर एका अनोळखी ट्रक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मोठा अपघात घडला आहे. या घटनेत किरण मदत गि-हे (वय 36, रा. एटेनखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा) आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. ही घटना काल दि. 8 डिसेंबर रोजी 6 च्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की फिर्यादी किरण हे त्यांची नोर्ट कायगर कार (क्र. एम एच 28 वि क्यु 5263) मलकापूर कडून जळगाव खान्देश येथे जात असताना, सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावर पसार झाला. दिलेल्या फिर्यादीवरून मलकापुर शहर पोलीस स्टेशन येथे कलम 281, 125(a), 125(b) BNS सहकलम 184, 134 मो.वा.का. नुसार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेका शरद मुंडे करीत आहे.