मलकापूर :-होमगार्ड पथक मलकापूर येथे आज दिनांक:- 08/12/2024 रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा बी. बी. महामुनी यांचे आदेशाने तालुका समादेशक होमगार्ड पथक मलकापूर श्री. गंगाधर महाजन यांचे मार्गदर्शना खाली होमगार्ड संघटनेचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला
त्यामध्ये होमगार्ड पथक मलकापूर होमगार्ड यांनी जनजागृती रॅली काढून रॅली ही पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथून सुरु होऊन तहसील चौक,हनुमान चौक, निमवाडी चौक, गांधी चौक, किल्ला चौक,सालिपुरा अशी घेण्यात आली.
सालिपुरा येथे पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. संदीप काळे यांचे उपस्थित मध्ये पोलीस स्टेशन जवळील परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवीण्यात आले असून माळरानामध्ये पाठकतर्फे वृक्षरोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्रीय आयुष मंत्रालयच्या *देश का प्रकृती परीक्षण* आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून अनुभवी आयुर्वेद चिकित्सक डॉ. भागवत वसे M.D आयुर्वेद यांचेकडून होमगार्ड यांचे तपासणी करण्यात आली.त्याचप्रमाणे इच्छुक होमगार्ड यांनी रक्तदान केले. होमगार्ड हे पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करीत असतात तसेच नैसर्गिक आपत्ती कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्ड यांचा मोलाचा वाटा आहे असे पोलीस निरीक्षक श्री संदीप काळे यांनी वर्धापन दिनी कार्यक्रमात म्हटले आहे.कार्यक्रमाकरिता सुमारे 150 होमगार्ड पुरुष व महिला हजर होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता पथकातील सर्व अधिकारी व होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.