Headlines

खामगाव विधानसभा मतदार संघात ‘सत्तेच्या गलथान खेळात गोरखधंदा’; नाराज कार्यकर्त्यांचे बंड अन् चहा पेक्षा कॅटली गरम

खामगाव( दिपक इटणारे ): महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे रण तापत असताना खामगाव मतदार संघात मात्र सत्ताधारी नेत्यांच्या गैरवर्तणुकीचे परिणाम उमेदवारांना भोगावे लागत आहेत. विशेष मर्जीतील कार्यकर्त्यांना प्राधान्य देत असताना खरे कार्यकर्ते मात्र नाराज होऊन विद्रोहाच्या तयारीत दिसत आहेत. सत्ताधारी आमदार आणि नेत्यांमुळे विधानसभा निवडणूक ‘गोरखधंद्याचा खेळ’ ठरली आहे, असे प्रतिपादन आता कट्टर कार्यकर्त्यांकडून होत आहे.

कॅटल्यांच्या’ दबदब्यामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा उघड

सत्ताधारी आमदारांच्या खास मर्जीतील काही ठराविक कार्यकर्त्यांचा परिसरात इतका प्रभाव आहे की, ज्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र नाराजी पसरली आहे. सत्ताधारी आमदारांना भेटण्यासाठी या मर्जीतील कार्यकर्त्यांचा परवानाच आवश्यक आहे, हे खरे कार्यकर्त्यांना अपमानास्पद वाटू लागले आहे. “चाय पेक्षा कॅटल्या गरम” ही संज्ञा आता या कामचुकार मंडळींवर केली जात आहे, आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश दिसून येतो आहे.

नेत्यांचे आवडते ठरलेल्या ‘पोस्टमन’ला विरोध; कट्टर कार्यकर्त्यांचे बंड

सत्ताधारी नेत्यांचे खास प्रतिनिधी ठरलेला “पोस्टमन” म्हणून ओळखला जाणारा कार्यकर्ता हे नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी कडून प्रयत्न करत आहे. परंतु, या नाटकांमुळे उलट कट्टर कार्यकर्त्यांमध्ये तिळपापड झाला आहे. बजरंग दलाच्या एका नेत्याने उघडपणे बंड पुकारले, आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरून संपूर्ण कॅटल्यांच्या गोरखधंद्याचे पर्दाफाश केले. परंतु, सत्ता वापरून त्याचा अर्ज मागे घेतला गेला, ज्यामुळे बजरंग दलातील कार्यकर्त्यांचा आक्रोश अधिक वाढला आहे.

नेत्यांनी निवडणूक ‘बाजारू सौदा’ बनवली, कार्यकर्त्यांचा विश्वास गमावण्याची वेळ

नेत्यांच्या या दुटप्पी धोरणामुळे अनेक कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. अशा बेभरवशी नेत्यांवर विश्वास ठेवून या निवडणुकीत जनतेच्या समस्या सोडवल्या जातील, हा विश्वास संपला आहे. स्वतःला मुस्लिम समाजाचा नेता मानणारा कार्यकर्ता, गांधी चौकातील पत्रकार मंडळींचा गट आणि सतीफैल परिसरातील त्रिकुट हे नेत्यांचे मुख्य आधार बनले आहेत.

मूल कार्यकर्त्यांमध्ये विरोधाची खदखद; निवडणुकीत निष्ठावंतांची उपेक्षा

सत्ताधारी नेत्यांच्या कॅटल्यांनी मतदार संघातील वातावरण बिघडवले आहे. खरे कार्यकर्ते नाराज असून, त्यांच्या विश्वासाला धक्का बसला आहे. “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी असंतोषाची चर्चा मतदार संघभर पसरली आहे, त्यामुळे या सत्तेच्या गोरखधंद्यात सत्ताधारी नेते जिंकले तरी कार्यकर्त्यांच्या नाराजीतून मोठा पराजय त्यांना भोगावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *