( उमेश ईटणारे )
मलकापूर: मलकापूर येथील जागरूक हिंदू समाज आणि विविध संघटनांनी एकत्र येत “भव्य हिंदू स्वाभिमान मेळावा” आयोजित केला आहे. या ऐतिहासिक मेळाव्याद्वारे हिंदू धर्माच्या स्वाभिमानाची आणि एकतेची ताकद प्रदर्शित केली जाणार आहे. आज दिनांक: 14 नोव्हेंबर, 2024 रोजी वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता हा सोहळा समर्पण लॉन, मलकापूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जागरुक मलकापूर कृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मलकापूर, व सकल हिंदू समाज मलकापूर यांच्याद्वारे करण्यात आले आहे.या मेळाव्यात हिंदू धर्म, संस्कृती आणि एकतेचा गौरव केला जाईल. आयोजकांनी मलकापूरातील सर्व जागरूक हिंदूंना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. “सर्वांनी आपली सर्व कामे बाजूला ठेऊन मेळाव्याला उपस्थित राहावे आणि एकत्र येऊन हिंदू स्वाभिमानाचा ठसा ठेवावा,” असे आयोजकांनी सांगितले.मेळाव्यात वंदे मातरम् आणि भारत माता की जय चा जय घोष केला जाणार असून, हा कार्यक्रम मलकापूरच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. हिंदू समाजाच्या एकतेची आणि सामर्थ्याची प्रचिती इथून सर्वत्र जाईल.