मलकापूर:- काल 11 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील ग्राम विवरा शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घेऊन जात असलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या अपघातात एकूण १३ शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्राम झोडगा येथील शेतमजूर महिलांची एक गट विवरा येथील वासुदेव किसन भोगे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. दिवसभर कापूस वेचून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घराकडे परतत होत्या,दरम्यान ग्राम विवरा येथील प्रल्हाद बोरले यांच्या शेताजवळ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. ट्रॅक्टर चालक प्रवीण वासुदेव भोगे यांच्यासह १३ महिलांचा यात समावेश आहे.
अपघातातील जखमी महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
संगीता गजानन मोरे (वय ४०)
प्रमिला शंकर वराडे (वय ६०)
उषा नारायण वेरूळकर (वय ४०)
राधाबाई पुंडलिक भारंबे (वय ६५)
सुनंदा माणिकराव चव्हाण (वय ३०)
बेबाबाई नामदेव आव्हाड (वय ६५)
प्रमिला लक्ष्मण सोळंके (वय ३०)
ताईबाई साहेबराव निकाळजे (वय ३०)
वंदना राजेंद्र खडसे (वय ४०)
सविता वैभव खडसे (वय २२)
सरला गणेश भोळे (वय ३५)
सुषमा शांताराम अहिरे (वय ४०)
उषा रमेश निकाळजे (वय ३५)
सर्व जखमी महिलांचा उपचार सुरू असून, त्यांना विवरा येथील ग्रामस्थ राजेशसिंग राजपूत, वासुदेव भोगे, बाळू भागलकर आणि अमित राजपूत यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि विविध मान्यवर रुग्णालयात धावले. डॉ. स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार सुरू आहेत.