मुलीचे आणि आईचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले; 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल!

खामगाव (सुटाळा बु.): घराशेजारी राहणाऱ्या एका २० वर्षीय युवकाने विकृत मानसिकतेने दोन महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाने टिनपत्राच्या फटीतून मोबाईलचा वापर करून एका तरुणीचे आणि तिच्या आईचे आंघोळ व लघुशंका करतानाचे व्हिडीओ काढले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, १० नोव्हेंबर रोजी तरुणी स्नानगृहात आंघोळ करत असताना, तिला मोबाईलचा फ्लॅश दिसला आणि संशय आला. तिच्या निरीक्षणात आल्यावर तिने ही माहिती लगेच आपल्या आईला दिली. आईने संशयित युवकाकडे विचारणा केली आणि त्याच्या मोबाईलमध्ये सदर आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे उघड झाले.
याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी युवकाविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७७, ७८ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!