( उमेश ईटणारे )
मलकापूर :- काँग्रेस पक्षाने मलकापूर शहरातील पाणी समस्येवर दिलेल्या आश्वासनांना सत्तेवर येऊनही काही साधता आलं नाही. आमदार राजेश एकडे आणि माजी नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी पाच पाण्याच्या टाक्यांचा वायफळ वादा करून मलकापूरकरांना फसवलं आहे. “पाच पाणी टाक्या उभारून शहराला नियमित पाणीपुरवठा करणार” असं आश्वासन दिलं, परंतु पाच वर्षांचा काळ उलटूनही आजही मलकापूरकरांना कधी पाणी मिळेल, अशी स्थिती आहे. या आश्वासनांची सारी हवा उडालेली आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली आश्वासनं केवळ पोकळ ठरली असून, मलकापूर शहरात अजूनही पाणीपुरवठा हा एक गंभीर प्रश्न झालेला आहे. शहरातील नागरिकांना दर दहा ते पंधरा दिवसांत एकदाच पाणी मिळणं हेच सत्य आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना घरात मोठ्या आकाराच्या टाक्या ठेवून पाणी साठवावं लागते. यामुळे प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याची समस्या अजूनही अनसुलझीच आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त आश्वासनं देऊन नागरिकांकडून मते मिळवली, परंतु प्रत्यक्षात कुठेही पाणीपुरवठ्याबाबत काहीही ठोस पाऊल उचललेले नाही. शहरातील शाळा, रुग्णालयं, वाणिज्यिक केंद्रे या सर्वांना पाणी मिळवणं ही एक मोठी आव्हान बनली आहे. मात्र, प्रशासन व नेतेमंडळी या गंभीर मुद्द्यावर गप्प आहे.याशिवाय, काँग्रेसच्या वायफळ आश्वासनांच्या पाश्र्वभूमीवर, मलकापूरकर आता या सर्वांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहेत.
आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या पोकळ आश्वासनांची पोलखोल होईल, आणि मलकापूरकर त्यांच्या वागणुकीला योग्य उत्तर देतील. यावरुन हेच सिद्ध होतं की, काँग्रेसच्या नेत्यांची केवळ गप्पांची आणि फुकाच्या आश्वासनांचीच तयारी आहे, पण ते मलकापूर शहराच्या पाणी समस्येवर कार्यवाही करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत.
पाणी साठवणामुळे डेंगूचा धोका..
पाणी साठवणामुळे फक्त पाणीटंचाईचं संकटच नाही, तर त्यासोबतच डेंगू सारख्या गंभीर रोगांचा धोका देखील वाढत आहे. मलेरिया आणि डेंगू सारख्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या एडीज मच्छर या मच्छरांना पाणी साठवण करणे हे अत्यंत अनुकूल वातावरण प्रदान करते. या मच्छरांच्या अंडी पाण्याच्या थेंबांमध्ये घालतात आणि त्यामुळे रोगाचा प्रसार होतो.मलकापूरसारख्या पाणीटंचाई असलेल्या शहरांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवण करत असतात. घराच्या छतावर, वॉटर टॅंक, डब्यात किंवा इतर जागांमध्ये पाणी साठवले जात असते, जेथे मच्छर अंडी घालू शकतात. एकच थेंब पाणी असले तरी त्या पाण्यात मच्छरांची अंडी विकसित होऊ शकतात, आणि काही दिवसांत ते मच्छरांची जंतू म्हणून जन्म घेतात. डेंगू हा एक संक्रामक रोग आहे, ज्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. एकीकडे पाणी साठवण केलं तर डेंगू सारख्या आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे तर दुसरीकडे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी साठवून ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही शहरातील नागरिकांनी करावं तरी काय असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.