( उमेश ईटणारे )
मलकापूर :- निवडणूक आयोगाने एका अडत व्यापाऱ्याचे चार लाख रुपये जप्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला. बाजार समितीतील शेतकऱ्यांना देण्यासाठी अडत व्यापारी बँकेतून पैसे काढून आणत होता. मात्र, महामार्गावर जात असताना निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून पैसे जप्त केले.सदर अडत व्यापाऱ्याने सर्व आवश्यक पुरावे दिले तरीही निवडणूक आयोगाने पैसे परत केले नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला. शेतकऱ्यांनी आपला विरोध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग जाम केला. त्यामध्ये वाहतूक एकाच ठिकाणी अडकल्याने तीन ते चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.तथापि, ठाणेदार व तहसीलदार यांच्या हस्तक्षेपानंतर शेतकऱ्यांची समजूत घालण्यात आली आणि मार्ग मोकळा करण्यात आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून निवडणूक आयोगाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.