Headlines

मलकापूर विधानसभा मतदारसंघात हरीश रावळ यांच्या माघारीमुळे काँग्रेसला दिलासा; मुख्य सामना राजेश एकडे विरुद्ध चैनसुख संचेती

( उमेश ईटणारे )

मलकापूर :- विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून, ईथे तीन उमेदवारांत चुरशीची लढत होईल, असे प्राथमिक चित्र होते. हरीश रावळ हे काँग्रेसचे असंतुष्ट नेते असल्याने, त्यांचा अर्ज माघार घेण्याचा निर्णय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यावेळेस काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे हरीश रावळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणार होते. अशी शक्यता होती, ज्यामुळे मतविभाजन होऊन काँग्रेससाठी धोका निर्माण होण्याची शक्यता होती.हरीश रावळ यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांच्यामुळे होणारे मतविभाजन टाळले जाऊ शकते. हे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी अनुकूल ठरणार आहे. आता मलकापूर मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवार उरले आहेत – विद्यमान आमदार राजेश एकडे आणि भाजपाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती. यामुळे मुख्य सामना काँग्रेस आणि भाजप यांच्यात होईल. भाजपाचे चैनसुख संचेती हे माजी आमदार असून भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्त्वात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची ताकद काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरू शकते. तर दुसरीकडे, विद्यमान आमदार म्हणून राजेश एकडे यांना जनसंपर्क आणि मतदारांशी असलेले नाते याचा फायदा होऊ शकतो.

हरीश रावळ यांच्या माघारीमुळे काँग्रेसने एक महत्त्वाची रणनीतिक बाजी जिंकली आहे, ज्यामुळे काँग्रेसच्या एकत्रित मतांच्या शक्यता वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *