दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्टर उलटले; चालक जखमी, आव्हा परिसरातील घटना!

मोताळा : काल ३० ऑक्टोबर रोजी दहिगाव आव्हा परिसरात ट्रॅक्टर अपघात झाला. ट्रॅक्टर चालक शुभम घोंगटे यांनी समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेतला, पण गवतामध्ये खड्ड्यात गेल्याने ट्रॅक्टर उलटण्यापासून थोडक्यात वाचला. यात घोंगटे किरकोळ जखमी झाले. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असल्याने ग्रामस्थांनी रस्त्यालगतचे गवत काढण्याची आणि मुरुम टाकून भरावाची मागणी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!