( उमेश ईटणारे )
मलकापूर :- मलकापूर शहराचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी नागरिकांना सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, शहरातील सर्व नागरिकांनी खालील उपाययोजना लक्षात ठेवाव्यात:
1. शेजाऱ्यांची मदत: बाहेरगावी जात असताना आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करा, ज्यामुळे घराची सुरक्षा वाढेल.
2. मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता: मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घरात ठेवणे टाळा, तसेच रोख रक्कम कमी प्रमाणात ठेवा.
3. प्रकाश आणि संरक्षण: घराच्या समोरील व पाठीमागील बाजूस लाईट लावून ठेवा. दरवाज्यांवर पडदा व कुलूप लावण्याची काळजी घ्या.
4. अनधिकृत व्यक्तींची माहिती: आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्यावर लक्ष ठेवा आणि त्वरित पोलीसांना माहिती द्या.
5. फसवणूक व सावधानता: “सणानिमित्य सवलत” देणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. OTP किंवा CVV क्रमांक देऊ नका आणि अनधिकृत लिंक्सवर क्लीक करणे टाळा.
6. ATM वापरात सावधगिरी: ATM कार्ड वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कार्ड देऊ नका, आणि पिन नंबर गोपनीय ठेवा.
7. CCTV कॅमेरे: आपल्या घरात किंवा दुकानात CCTV कॅमेरे बसवणे उपयुक्त ठरू शकते.
8. संशयास्पद व्यक्ती: “दागिने पॉलिश करतो” असे सांगणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलीसांना संपर्क साधा.
9. तोतया पोलीस: “आम्ही पोलीस आहोत” असे सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावधान राहा.
10. अफवांवर विश्वास नका: कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
11. अडचणीच्या वेळेस संपर्क: अडचणीच्या वेळी त्वरित पोलीसांशी संपर्क साधा. आपातकालीन परिस्थितीत डायल 112 वर कॉल करा 12.
गणेश गिरी यांनी नागरिकांना या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून नागरिक दिवाळीच्या सुट्टीचा चांगला आनंद घेऊ शकतील. आणि आपले घर सुरक्षित राहील. सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, म्हणून या सूचना लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घ्या.