Headlines

सोयाबीन गंजीला आग, अज्ञाताविरुध्द गुन्हा; शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी!

नांदुरा: शेतकऱ्याने ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या सोयाबीन गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्यामुळे १२ पोते सोयाबीन आणि ताडपत्री जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे ४२ हजारांचे नुकसान झाले आहे.

२७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाकुड शीवाऱ्यातील उध्दव हरीचंद्र सित्रे यांच्या शेतात ही घटना घडली. सित्रे यांनी आपल्या ७४ आर शेतीत सोयाबीन पेरले होते, ज्याची गंजी ताडपत्रीने झाकून ठेवली होती.

आगीची माहिती मिळताच, सित्रे आणि त्यांच्या मित्रांनी शेतात धाव घेतली, परंतु तेव्हा त्यांची गंजी जळून खाक झाली होती. उध्दव सित्रे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या माहितीवरून पोलिस आणि तलाठी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. तहसीलदाराकडे अहवाल पाठविला असून, शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *