सिंदखेडराजा :- तालुक्यातील वरदळी बुद्रुक. येथिल शेतकरी आंब्याची फांदी तोडत असतांना फांदी अंगावर पडल्याने पोटाला व छातीला हातापायाला मार लागल्याने सदर शेतकऱ्याचा जागीच दबुन मृत्यू झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. नामदेव गुलाबराव आटोळे वय ५० वर्ष असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून घरची परिस्थिती बेताची असल्याने सदर शेतकरी विनोद रावसाहेब काकडे यांची शेती बटाईने करत होते. सदर शेतात मध्यभागी आंब्याचे झाड होते. त्या झाडाच्या फांद्या शेतीची मशागत करतांना ट्रॅक्टर अडसर ठरत असल्याने नामदेव आटोळे वारंवार शेतमालक विनोद काकडे यांना अडसर येणाऱ्या फांद्या तोडाव्या लागतात असे म्हणत होते परंतु
शेतमालक विनोद काकडे फांद्या तोडण्यास नकार देत होते. परंतु नामदेव आटोळे यांनी कोणाला काही न सांगता काल 19 ऑक्टोबर रोजी दुपारी फांद्या तोडण्यास गेले व फांदी अर्धवट तोडून खाली उतरून फांदी ओढुन मोडण्याचा प्रयत्न करत असतांना फांदी अंगावर पडून पोट दाबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतमालक विनोद शेतात फेरफटका मारत असतांना आंब्याची फांदी अर्धवट तोडलेली दिसल्याने ते आंब्याखाली गेले असता त्यांना नामदेव आटोळे मरण पावले असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी नामदेव आटोळे यांचा मोठा मुलगा आकाश आटोळे यास फोन करून झालेला प्रकार सांगितला यावेळी गावातील अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस ठाण्यात संपर्क करून सदर घटनेची माहिती दिल्यावर लगेच ठाणेदार विनोद नरवाडे, पोहेकॉ रमेश गोरे, सलिम परसुवाले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. मुलगा आकाश आटोळे यांच्या तोडी फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार रमेश गोरे, परसुवाले करित आहेत. मयत नामदेव आटोळे यांच्या पश्चात वडील, एक भाऊ, दोन मुले, एक मुलगी, व पुतने असा परिवार आहे.