मलकापूर :- मलकापूर शहर व तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांचे सुद्धा फार नुकसान झाले आहे तरी मलकापूर शहरांमध्ये काही नागरिकांना आर्थिक मदत शासनाकडून होत आहे परंतु याच्यामध्ये दुटप्पीपणाचे राजकारण होत असून ज्या नागरिकांचे खरंच नुकसान झाले आहे ते मदतीपासून वंचित राहत आहे तरी शासनाने शहरात व तालुक्याचा सर्वेक्षण करून तातडीने वंचित राहिलेले नागरिकांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी युवा सेना उबाठा च्या वतीने एका निवेदनाने करण्यात आली. निवेदन देतेवेळी युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक रवींद्र गव्हाळे,सय्यद वसीम,किसान सेना शहरप्रमुख इमरान लकी,वाहतूक सेना शहरप्रमुख माजी नगरसेवक पांडुरंग चीन,सुरेश ढोले,मयूर टाटर, इनुस खान,राहुल खंडागळे,शेषराव सांबारे,प्रकाश मावळे,गोपाल तांदुळे, यांच्यासह शिवसैनिक व पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते