मलकापूर :- खावटी प्रकरणात रक्कम न भरल्याने न्यायालयाने काढलेल्या वारंट वरून स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणा यांनी शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख दिपक चांभारे यांना अटक करून अकोला न्यायालयात हजर केले असता त्याने खावटी प्रकरणात ८० हजार रूपये भरल्याने न्यायलयाने अटी व शर्तीवर सोडून दिले आहे.
याबाबतची माहिती अशी की, मलकापूर येथील शिवसेना (उबाठा) चे तालुका प्रमुख दिपक चांभारे (पाटील) याचे विरूध्द अकोला न्यायालयात त्याच्या पत्नीने खावटीचा अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये न्यायालयाने ८ लाख ५० हजार रूपये खावटी देण्याचा निर्णय दिला होता. त्यामध्ये खावटी न भरल्याने अकोला न्यायालयाने गैरअर्जदार दिपक चांभारे विरूध्द वारंट काढून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पोलिसांनी त्यास १४ ऑक्टोबर २०२४ रोजी मलकापूर न्यायालयातून अटक केली. त्यानंतर मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे एएसआय कुळकर्णी, पोकॉ ईश्वर वाघ, चालक पोकॉ जाधव यांनी त्यास शासकीय वाहनाने घेवून जात अकोला न्यायालयात हजर केले असता त्याने न्यायालयात ८० हजार रूपये भरले. त्यामुळे त्यास न्यायालयाने सोडून दिले व २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १ लाख २० हजार रू. तसेच पुढील तीन महिन्यापर्यंत ८ लाख ५० हजार रूपये अर्जदार यांना देण्यात यावे. असे आदेश दिले.
या प्रकरणी २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.