मलकापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य , पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल ,अमरावती येथे दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी पार पडल्या. त्यामध्ये नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
विभागीय स्तरावर झालेल्या सॉफ्ट टेनिस वैयक्तिक स्पर्धेत कु. सोनल गणेश खर्चे १७ वर्ष वयोगटामध्ये रौप्य पदक , मयंक विजय पळसकर १४ वर्षे वयोगटांमध्ये रौप्य पदक , कार्तिक अजय कुदळे १७ वर्षे वयोगटामध्ये रौप्य पदक , ओम रामेश्वर मोरखडे १७ वर्षे वयोगटांमध्ये रौप्य पदक व गुरुदत्त अश्विन यादव १९ वर्षे वयोगटामध्ये कांस्यपदक प्राप्त केले.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी सांघिक प्रकारामध्ये सुद्धा सुवर्णपदक प्राप्त केले असून सर्व विद्यार्थ्यांची राज्य स्तरासाठी पात्र ठरले आहेत. सर्व विद्यार्थी तालुका क्रीडा संकुल , मलकापूर येथे सराव करतात.
सदर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय लोकसेवा बहुउद्देशीय मंडळाचे संचालक मंडळ तसेच प्राचार्य ए. डी. बोरले , पर्यवेक्षक पी. एस. टेकाडे, क्रीडा शिक्षक डी.एस. राठोड तसेच आर. पी. भारंबे तसेच विजय पळसकर , गणेश खर्चे यांना दिले आहे.