शेतकरी कन्या पुत्रअभ्यासिकेचे विद्यार्थी व दानशूरांचा निंबोळा येथे सत्कार सोहळा..
नांदुरा :- स्पर्धा परीक्षा व विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मुलामुलींसाठी वरदान ठरलेल्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या कार्यासाठी सदैव तत्पर राहून राज्यभर शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका उभारणीसाठी संघटनेसोबत कार्यरत राहील असे प्रतिपादन शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ कोमलताई सचिन तायडे यांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी निंबोळा येथे झालेल्या विद्यार्थी व दानशूरांच्या सत्कार सोहळ्यात केले.नांदुरा येथील भारतीय संगीत कला केंद्राचे संचालक प्राध्यापक वामनराव भगत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेतील विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल व अभ्यासिकेत लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे पुस्तके,फर्निचर व वेगवेगळ्या स्वरूपाची आर्थिक मदत करणाऱ्या दानशुरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये निंबोळा अभ्यासिकेतील सुपेश गजानन भगत याची अग्नीवीर व पल्लवी जनार्दन भगत हिची होमगार्ड या पदासाठी निवड झाली. शेंबा येथील अभ्यासिकेतील मनीश सुभाष कवडे याची एस आर पी एफ, पवन श्रावण भिडे याची पोलीस प्रशासन, रोशन पारस्कार याची होमगार्ड, नवल प्रकाश दाभाडे आरोग्य सेवक, सलमान खा करामत खा पठाण होमगार्ड, आदित्य कैलास सुशीर आरोग्य सेवक, उमेश मुकुंद भिडे पोलीस प्रशासन, तसेच खुमगाव येथील अभ्यासिकेतील अभिषेक वासुदेव मुंढे अग्निवीर, वैभव भागवत फाळके रेल्वे क्लर्क, वैभव वासुदेव वावगे एअर फोर्स आणि ओम विजय देशमुख याची अग्नीवीर मध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेला पुस्तके तसेच विविध साहित्याची मदत करणाऱ्या स्वाती ताई जाधव, अनंत गायकवाड,सौं वनिताताई गायकवाड,माधवराव गायकवाड, नंदू भाऊ खोंदले पत्रकार वीरेंद्र सिंग राजपूत,रोहित सोनोने यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी नांदुरा येथील 220 विद्यार्थी व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करून शासकीय परीक्षेत यशस्वी होत असून सर्वत्र शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिका होणे गरजेचे असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश गावंडे म्हणाले.यावेळी महाराष्ट्र शासनाच्या नॉन ओव्हन बॅग निर्मिती प्रकल्पात शेकडो महिलांना रोजगार दिल्याबद्दल सो कोमलताई सचिन तायडे यांचा सुद्धा सर्व विद्यार्थी व मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.नंतर सर्व मान्यवर, विद्यार्थी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निंबा आईची महा आरती करण्यात आली. यावेळी पद्माकर ढोले, सुरेश अढाव,पुरुषोत्तम भगत,स्वप्नील भगत तसेच पालक वर्ग, विद्यार्थी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन पत्रकार लक्ष्मण वक्ते यांनी तर प्रस्ताविक अक्षय बोचरे यांनी केले.