मलकापूर येथे कृषी विभाग आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेट संपन्न

मलकापूर :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांनी आयोजित जिल्हास्तरीय मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी मलकापूर यांचे कार्यक्षेत्र मध्ये दिनांक 27/ 9/ 24 रोजी आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्रीराम पाटील दाताळा यांचे शेतात भेट, विष्णू भोपळे घिर्णी यांचे शेततळ्यास भेट , वाघुळ येथिल रामेश्वर सातव यांचे पीएफएमई अंतर्गत मका भरडा युनिटला भेट, माऊली सेंद्रिय गट वाघुळ येतील जैविक फार्म लॅब ला भेट,

तसेच समारोपीय कार्यक्रम श्री कपिल राठी मलकापूर यांचे निंबाई फुड्स अँड फूडर्स येथील मुरघास उत्पादन युनिटला भेट देऊन चर्चासत्र आयोजित करण्यात आले ,कार्यक्रमाचे सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊंचे पूजन ,करून निंबाई परिवारातर्फे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी  अशोक कोळेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन शिवश्री रवी खराटे यांनी केले, आभार प्रदर्शन  गजानन नमायते यांनी केले. चर्चा सत्राचे कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी  सवडतकर ,उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव  व्यवहारे , तसेच तंत्र अधिकारी सुरडकर , तालुका कृषी अधिकारी मलकापूर ललित सूर्यवंशी , संग्रामपूर चे  वाकोडे  तसेच जळगाव जामोद चे  बनसोडे  तसेच जिल्हाभरातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच सचिन तायडे साहेब उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मलकापूर हे पण प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला लाभले, निंबाई फीड्स अँड फूडर्स यांचे मुरघास उत्पादन युनिटचे लाईव्ह डेमो या ठिकाणी दाखवण्यात आले व प्रकल्पाबद्दल विस्तृत माहिती श्री राम राखोंडे यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निंबाई फीड्स अँड फुडरचे राम राखोडे, आकाश नवथडे ,वैभव म्हसागर, अश्विनी सोनोने,चंचल शिगोकार ,जुम्मा चव्हाण ,प्रशांत इंगळे यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Comment

error: Content is protected !!