Headlines

जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; गणेश भक्तांवर लाठीचार्जे प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी सह एसआरपी पोलीस निलंबित

जळगाव जा. :- येथे ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडत असताना व शहरात तगडा पोलिस बंदोबस्त असतानाही समाजकंटक आणि उपद्रवखोरांच्या टोळीने डाव साधला आणि जामा मशीद परिसरातून विसर्जन मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. यात अनेक भाविक जखमी झाले. दगडफेकीमुळे गणेश मंडळांनी १८ तासांपर्यंत मिरवणूक थांबवून ठेवली होती. याप्रकरणी एसडीपीओ देवराव गवळी सह एस.आर.पी पोलीस यांना निलंबित करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरला दुपारी गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू होती. रात्री ८ वाजेपर्यंत शांततापूर्व वातावरणात तरुणाईचा उत्साह ओसंडत असतानाच जामा मशीदजवळ अजान सुरू होताच मिरणुकीतील वाद्ये ठप्प झाली. त्याचवेळी वायली वेस परिसरात शेवटचे श्री रूपलाल महाराज गणेश मंडळ चौभाऱ्याकडे आल्यावर मशीद परिसरातील भागातून एकदम दगड व विटांच्या तुकड्यांचा जबर मारा विसर्जन मिरवणुकीवर करण्यात आला. त्यामुळे सुरू असलेले डीजे, बँड व ढोल ताशे बंद झाले. ठाणेदारांनी पोलिस कर्मचारी व शांतता समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन जामा मशीद जवळून वायली वेसवर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मुख्य मिरवणुकीत स्टेट बँकेजवळ महात्मा फुले गणेश मंडळ व अंबिका गणेश मंडळ तर जुन्या बाजारामध्ये जय ओंकारेश्वर गणेश मंडळ, जय शिवाजी गणेश मंडळ, मयूर गणेश मंडळ, सूर्यवंशी गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ व चौभारा परिसरातील श्रीकृष्ण गणेश मंडळ, संत रूपलाल महाराज गणेश मंडळ असे एकूण ३ ठिकाणी ११ सार्वजनिक मंडळं जागेवरच रात्री साडेआठ वाजतानंतर थांबले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!