जळगाव जामोद :- लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात अगदी उत्साहाच वातावरण असतांना बुलढाणा जिल्यातील जळगाव जामोद येथून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनाने ठरवलेल्या मिरवणूक मार्गावरून मिरवणूक जात होती. आधी विद्युत पुरवठा खंडित झाला नंतर गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.ही घटना काल दि.17 रोजी जळगाव जामोद शहरातील वायली वेस भागात घडली.सर्व काही व्यवस्थित चालू असताना दगड फेकीच्या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.काल रात्री ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. तेव्हापासून गणेश मंडळांनी गणपती जागेवरच ठेवले असून जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दगडफेकीच्या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, जळगाव जामोद येथील घटना
