( वृत्तसेवा )
देऊळगाव राजाः शहरातील रहमत नगर येथील फिर्यादी महिलेला घटस्फोटासाठी कोर्टात केलेली केस मागे घ्यावी, या कारणावरून गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ तसेच मारहाण केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी शहरात घडली, या कारणी ८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पो. स्टेशनमधून मिळालेल्या, माहितीनुसार आरोपीशी रहमत नगर येथील फीर्यादीचा विवाह झालेला असून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू आहे. त्याबाबत कोर्टामध्ये घटस्फोट, खावटीची केस सुरू होती. विवाहीतेच्या सासरकडील मंडळी व आरोपी देऊळगाव राजा येथे आले होते. सदर केस परत घ्या, या कारणावरून यातील मुख्य आरोपीसह आठ लोक फिर्यादी महिलेच्या घरी आले. आरोपींनी महीलेला काठीने डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी असलम शहा खलील शहा, खालील शहा मिया शहा, अफजल शहा खलील शहा, सलमा बी खालील शहा सर्व रा. साखरखेर्डा, अजिस उर्फ जुम्माशहा आयुब शहा, आसमा बी अजिस शहा दोन्ही रा. सोमठाणा तालुका सिल्लोड, समीर पटेल रा. साखरखेर्डा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.