वृतसंस्था ) जळगाव : शेअर ट्रेंडिंगमध्ये
गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्राध्यापिकेची एक कोटी रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश सुभाष (२६), अंकुश सतपाल (२७), दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरयाणा या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन जणांना या पूर्वीच अटक केलेली आहे. आता अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून जळगावातील एका प्राध्यापिकेची १६ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केली होती.या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.आता पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकों दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, पोकों दीपक सोनवणे यांनी हरियाणा येथे जाऊन मुकेश सुभाष व अंकुश सतपाल या दोघांना अटक केले.