महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणार गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा होत आहे. यावर्षी हा उत्सव 9 दिवस चालणार असुन यामध्ये दररोज आरती, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव याहीवर्षी मागील वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करत आहे या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व तरुण मंडळी महाराष्ट्रमधून असून यामध्ये गौरव पुरुषोत्तम कापसे(बुलढाणा), निखिल बोऱ्हाडे(पुणे), केतन सोनार(जळगाव), प्रशांत भाटे, प्रशांत कोरडे, प्रद्युम्न देशमुख, जयेश शेलार(चाकण), ऋषिकेश चव्हाण(सातारा), तन्मयी सुतार (पुणे)आदी उपस्थित व यांच्या पुढाकाराने उत्सव पर पडणार आहे.गणेश मूर्तीचे सौजन्य पुणे (खेड)येथील प्रशांत कोरडे या युवकाने इंडिया मधून येतानाच श्रींची मूर्ती सोबत आणली होती.
हीच गणरायाची मूर्ती श्री गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. या वर्षी हा गणेशोत्सव 9 दिवस असून दररोज सकाळ संध्याकाळ आरती तसेच बाप्पासाठी नैवेद्य तसेच वेगवेगळे प्रसाद बनवून नैव्यद्य दाखविला जाणार आहे. तर लाडक्या गणरायाला रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी विसर्जन करीत निरोप दिल्या जाणार आहे.