दिव्यांगांचा 5% टक्के निधी ख्यात्यात जमा करा… दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भीक मांगो आंदोलनाचा इशारा

 

मलकापूर:- दिव्यांग लाभार्थ्यांचे 5% टक्के निधी वाटप करण्याबाबत दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आज रोजी नगरपालिका येथे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नगरपालिकेच्या दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के राखीव ठेवावा लागतो परंतू नगरपरिषदेच्या वतीने अद्यापही निधी वाटप झालेला नसून आज रोजी दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून दिव्यांग बांधवांचा निधी येत्या आठ दिवसात खात्यामध्ये जमा न झाल्यास संघटनेचे वतीने भिक मांगे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यावेळी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नागेश सुरंगे, महाराष्ट्र राज्य सहसचिव पंकज पाटील, सदस्य निखिल पोंदे, अशोक पवार, राजू रोडे, अनिल गोठो, संजय रायपुरे, गणेश सुरपाटणे, किशोर केने, शुभम तायडे, अमर सालवानी, दिलीप दगडे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!