Headlines

निवेदनाची दखल न घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात मनसेचे “श्रद्धांजली” आंदोलन

मलकापूर:-गरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा मिळावी, या आशेने आलेल्या रुग्णांना X-RAY टेक्निशियन उपलब्ध नसल्याने दिनांक 14 ऑगस्ट रोजी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश उंबरकार यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु तब्बल पंधरा दिवस उलटूनही निवेदनाची दखल न घेतल्याने संतप्त मनसे सैनिकांनी X-RAY मशीन ऑफिस ला हार फुल वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
बाहेरून X-RAY काढावा लागत असल्याने दिव्यांग रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चांगली सुविधा मिळावी म्हणून रुग्णही प्रतिप्रश्न न करता निमूटपणे आर्थिक नुकसान सहन करतात.
महागळ्या वैद्यकीय सेवांमुळे मोफत चांगली सुविधा मिळणार या आशेने शासकीय उपजिल्हा  रुग्णालयांकडे नागरिकांनचा कल वाढत आहे. परिणामी चाचण्या करण्यासाठी उपलब्ध मशीनरी उपजिल्हा रुग्णालयात आहेत परंतु त्या चालवण्यासाठी आवश्यक टेक्निशियन नसल्याने रुग्णांना बाहेरून चाचण्या कराव्या लागतात व त्याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवाना दिव्यांग सर्टिफिकेट मिळावे या करिता दिव्यांग बोर्ड मलकापूर येथे सुरू करण्यात आला आहे,त्यासाठी आवश्यक असलेला X-RAY काढण्यासाठी मात्र त्यांना बाहेर जावे लागते व बाहेर त्यासाठी 1800 ते 2000 हजार रुपये खर्च येतो हा खर्च गरीबांसाठी न परवडणारा असून गेल्या सहा महिन्या पासून मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात X-RAY टेक्निशियन नसल्याने X-RAY मशीन सुद्धा धूळ खात पडलेली आहे तरी लवकरात लवकर  X-RAY टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी केली होती परंतु निवेदनाची दखल न घेतल्याने मनसेने “श्रद्धांजली”आंदोलन केले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल,मनवीसे शहर अध्यक्ष निखिल पोंदे,राजेशसिह राजपूत,नंदकिशोर झोपे,दिव्यांग महिला कु.मीनाक्षी झोपे,दीपक जाधव,एकनाथ जाधव,श्याम क्षीरसागर, गजराज साळुंखे, रितेश भोपडे,यांचे सह मनसे सैनिक आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *