कुंडकर पुणेरी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न

पुणे :- कुंड बु तालुका -मलकापूर,जिल्हा बुलढाणा या गावातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांचा श्री आदीशक्ती मुक्ताबाई मंदिर गणेश नगर भोसरी येथे स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप विश्वनाथ पाटील (नाना पाटील) यांनी केले त्यानंतर श्री आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचे अध्यक्ष अमोल विषाणू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनतर गावातील मुलींचा व जवाई लोकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये मुलींना ब्लाउज पीस व जवाई लोकांना शाल आणि मुक्ताबाई चरित्र पुस्तक भेट देण्यात आले,यामध्ये सर्व मुलींचा परिचय वर्ग घेण्यात आला यानंतर सर्व गावकऱ्यांचा कुटूंबासोबत परिचय करण्यात आला. तसेच गावातील निधन पावलेले नागरिक व नेपाळ येथे झालेल्या दुर्घनेत निधन झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली,त्यानंतर सर्वांच्या वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाईची आरती करण्यात आली, पहिल्यांदा असा मेळावा झाल्यामुळे सर्व गावकऱ्यांचा अतिशय आनंद बघायला मिळाला सर्वांची ओळख झाली पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन मंगेश पद्माकर पाटील यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!