नांदुरा : पोलिसांनी जळगाव जामोद रोडवरील पोलिस वसाहतीसमोर नाकाबंदी करून एका चारचाकी वाहनाची २५ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान झाडाझडती घेतली असता त्यामध्ये गोमांस आढळून आल्याने तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदुरा पोलिसांना गुपित बातमीदाराकडून एका वाहनामधून गोमासाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एमएच ०४ जीआर २५२५ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोमास आढळून आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू दळवी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून वाहनासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख साबीर शेख सुपडू, शेख शकील शेख तस्लीम, शेख शरीफ शेख बपाती (५३, रा. कुरेशी मोहल्ला, जळगाव जामोद) या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३२५, ३(५) सहकलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ च्या कलम ५ (क),९ (अ), ९(ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.