मेहकर :- ( सतीश मवाळ )तालुक्यातील ग्राम पंचायत कासारखेड ते कळंबेश्वर रस्त्याला अनेक वर्षा पासून प्रशासनने दुर्लक्ष केल्यामुळे रोड खड्ढे मय झाला आहे . तसेच परिसरातील पाईप लाईन धारकांनी मोठ्या प्रमाणावर रोडचे खोदकाम केलेले आहे.त्याबाबत प्रशासनाची परवानगी घेतली असावी किंवा नसावी त्यामुळे त्या ठिकाणी भरावा व्यवस्थीत न केल्याने तेथील माती पावसामुळे खाली बसून त्यांचे नालीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे परिसरातील छोट्या वाहन धारकांना व मोटारसायकल स्वाराना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्र कंळबेश्वर असल्याने वृध्द, शाळेतील विद्यार्थी माल वाहतूक इत्यादी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक वेळी त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. कासारखेड ते कळंबेश्वर तीन किलोमीटर आंतर असून हे अंतर परिसरातील थार खुदनापुर इ. गावांना या रोडवरुन येण्या जाण्या साठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागत आहे . प्रशासनाने याची दखल घेऊन तात्पुरत्या स्वरूपात रोडवर पडले गठ्ठे बुजवून होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने प्रस्तुत प्रतिनिधी कडे केली आहे.
कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!
