Headlines

विध्यार्थी व शिक्षकांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत नको ते करायचा! आरोपी शिक्षक उगले भरणार पापाची फळे

दुसरबीडः वर्गातील अल्पवयीन मुलींचा वारंवार विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुध्द किनगावराजा पोलिसानी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे. वर्दही, ता. सिंदखेडराजा येथील जिल्हा परिषद शाळेत खुशालराव उगले नावाच्या शिक्षकाचा विनयभंग करण्याचा हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. २१ ऑगस्ट रोजी शाळेतील इयत्ता चौथीतील एका विद्यार्थिनीचा शिक्षक खुशालराव उगले याने वर्गात विनयभंग केला. झालेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यावरून विद्यार्थिनीची आई असलेल्या ही महिला २३ ऑगस्ट, शुक्रवारी जाब विचारण्यासाठी शाळेत गेली त्यावेळी अनेक पालकही उपस्थित होते. त्यानंतर ह्या सर्वांनी किनगावराजा पोलिस स्टेशन गाठले. ही माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी किनगावराजा गाठले. तेथे तीन अल्पवयीन विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली यावेळी दक्षता समितीच्या अध्यक्षा प्रतिभा गणेशराव जाधव व सदस्या सुनीता ओमप्रकाश राजोते ह्या उपस्थित होत्या. त्यावेळी झालेल्या चौकशीत इयत्ता चौथी मध्ये असलेल्या तीन मुलींनी सांगितले की, शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता तिसरीपासून म्हणजे वर्षभर पूर्वीपासून विद्यार्थिनींचा विनयभंग करीत आले आहेत. शिकवायला चांगले असलेले गुरुजी हे दुपारनंतर विद्यार्थ्यांना वर्गाच्या संपूर्ण खिडक्या लाऊन घ्यायला सांगत असत , त्यानंतर वर्गातील टिव्ही सुरु करीत असत. त्यावेळी मुलींना स्वतः जवळ बसवत व मुलांना मागे बसायला लावत असत त्यानंतर टिव्ही दिसण्यासाठी खोलीत झालेल्या अंधाराचा फायदा घेऊन, जवळच्या मुलींशी अश्लील कृती करून विनयभंग करीत असत. ह्या सर्व बाबींची शहानिशा केल्यावर एका १० वर्षीय विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक खुशालराव उगले, रा. पांची उगले, ह. मु. किनगावराजा याच्या विरोधात गु.२.नं. १८३/२०२४ कलम ६४ (२) (एफ) (१) (एम), ६५ (२) ७६(१) (۹) ۱۹) बी. एन. ५ सहकलम (पोस्को) ४, ६,८, १०,१२४ २ का. से. अ. प्र. अधि २०१२, सहजम ३ (१) (৫৩) (१) (१)(२) (व्ही) २ (१) (आर) (एसडब्लू) अजाज. प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम ह्या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *