अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बोदवड रोडवरील घटना

मलकापूर :- येथील 33 वर्षीय युवक मोटरसायकल ने बोदवड कडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना दी.20 मे रोजी पहाटे साडेसहा च्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की नितेश भालचंद्र हिवराळे वय 33 रा. वडगाव डिघी ता. नांदुरा ह.मु. गोकुळधाम मलकापूर हा क्रेन मशीनचे कॉन्टॅक्ट बेसवर रेल्वेचे काम करीत असून त्याच्याकडे असलेली हिरो होंडा शाइन क्र.MH 28-AY-7583 गाडीने कोलाडी बोदवड येथे सुरू असलेल्या कामावरती येणे जाणे करीत होता तर 20 मे रोजी सकाळी साडेसहा च्या सुमारास देवानंद वानखेडे रा. शिरसोडी ता नांदुरा यांनी फोन द्वारे माहिती दिली की दि.19 मे रोजी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास नितेश भालचंद्र हिवराळे हा कामानिमित्त मलकापूर वरून बोदवड कडे निघाला होता व सकाळी माहिती मिळाली की मलकापूर ते रोडवर ग्रामीण पोलीस स्टेशन दिशादर्शक बोर्ड जवळ सालीपुरा नाका जवळीलील दगडी पुलावर अपघात होऊन पडला आहे तसेच त्याला पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले आहे. सदर अपघातामध्ये त्यास गंभीर डोक्याला मार लागून तसेच त्याचा डावा हात मोडलेला असून त्याची मोटर सायकल चे नुकसान झालेले आहे तरी अज्ञात वाहनाने भरधव वेगात निष्काळजीपणाने चालून त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार मृतकाचे आजोबा नथुजी हिवराळे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, दोन लहान मुली ,एक भाऊ असा बराच मोठा परिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!