मलकापूरः- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये मलकापूर तालुक्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला. शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये श्रीहरी अकोटकर, १४ वर्षाखालील मुलींमध्ये कु. आनंदी शेलगेनवार (द्वितीय क्रमांक) व कु. किनीशा गांधी (तृतीय क्रमांक) तसेच १७ वर्षाखालील मुलांमध्ये मलकापूर तालुक्यातून चि. अजिंक्य कंडारकर (प्रथम क्रमांक), चि. ईशान जैस्वाल (द्वितीय क्रमांक), १७ वर्षाखालील मुलींमध्ये मलकापूर तालुक्यातून कु. ज्ञानीका जैस्वाल (प्रथम क्रमांक) व कु. मनस्वी केला (द्वितीय क्रमांक) मिळविला. या सर्व खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादित केले. जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले. या शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, मलकापूर तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा संयोजक दिनेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे संपन्न झाल्या.या यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल साळुंके, क्रीडा शिक्षक ओम गायकवाड, अजय शिंगणे, क्रीडा शिक्षिका मानसी पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या विजयी संघातील खेळाडूंचे शाळेचे संचालक अमरकुमार संचेती, मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा स्कूल ऑफ स्कॉलर्सचे खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर
