सिंदखेडराजा :- प्रतिनिधी – सचिन खंडारे
तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाई वर्मा करण्याकरता केंद्र शासन व राज्य शासनाने विविध योजनेच्या माध्यमातून नळ योजना सुरू करण्याकरता योजना सुरू केलेली आहेत, परंतु या योजना केवळ संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त कागदपत्रीच होत असून या माध्यमातून लाखो रुपये लाटण्याचे प्रकार समोर येत आहेत ,लाखो रुपयांची नळ योजना असल्यामुळे सहाजिकच संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला लालचेचे पाणी सुटत आहे, राष्ट्रीय पेयजल योजना व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सिनखेडराजा तालुक्यामध्ये जवळपास १५ गावांमध्ये नळ योजनेचे काम सुरू आहे ,कुठल्याही ठिकाणी नळ योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झाले नाहीत तरीसुद्धा ठेकेदाराने संगम मताने अधिकाऱ्याशी लगट करून बिले सुद्धा काढलेली आहे, त्यामुळे संबंधित गावचे सरपंच हे त्रासून गेलेले आहेत ,त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्याकरता नळ योजनेचे काम अजूनही अनेक ठिकाणी रखडलेले आपल्याला दिसत आहे, अनेक ठिकाणी इस्टेमेंटनुसार ठरवून दिल्याप्रमाणे पाईपलाईन असेल पाण्याची टाकी असेल इतर साहित्य असेल हे कामे झालेली नाहीत, यामध्ये शिंदी,गुंज,गारखेड,तांदुळवाडी, या गावासह ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे या संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करून चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहेत,काही ठिकाणी विहिरीचे स्पॉट बदलण्यात आलेली आहेत तर काही ठिकाणी पाईपलाईन खोल टाकण्यात आलेली नाही तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टाकी ही लिकीज आहेत,त्यामुळे लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे,